मुंबई, 25 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी आज (दि.25) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 7 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाने सुनील टिंगरे यांना पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यापूर्वी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत सुनील टिंगरे यांचे नाव नव्हते.
https://x.com/mahancpspeaks/status/1849678253520232450?t=4Tkw19pZI_K0Hst2AI0e1A&s=19
सुनील टिंगरे यांची उमेदवारी फिक्स!
त्यामुळे त्यांच्या त्यांच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील टिंगरे यांना आज वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, सुनील टिंगरे हे वडगाव शेरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्याशी होणार आहे.
नवाब मलिक यांच्या मुलीला उमेदवारी
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या उमेदवारांच्या यादीत नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्ती नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व मतदारसंघ, निशिकांत पाटील इस्लामपूरमधून, संजयकाका पाटील तासगाव – कवठेमहांकाळ येथून, शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके आणि लोहामधून प्रताप चिखलीकर यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीची दुसरी यादी
1) निशिकांत पाटील – इस्लामपूर
2) संजयकाका पाटील – तासगाव-कवठेमहांकाळ
3) सना मलिक – अणुशक्ती नगर
4) झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व
5) वडगाव शेरी – सुनील टिंगरे
6) शिरूर – ज्ञानेश्वर कटके
7) लोहा – प्रताप पाटील चिखलीकर