सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार ही अफवा – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई, 9 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार, ही अफवा असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या विधानावर 24 डिसेंबर रोजी बोलू, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

बेकायदा फटका विक्री, साठवणूक व हताळणे विरुद्ध कारवाई कोण करणार?

तत्पूर्वी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर ओबीसी आरक्षण संपून जाईल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे. “ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. कुणबीच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याची अफवा असून त्यामुळे ओबीसी समाजाने कोणताही संभ्रम मनात ठेऊ नये”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

यंदाच्या दिवाळीत लोकांना भेटता येणार नाही – अजित पवार

तर याआधी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याची चर्चा सुरू होती, यासंदर्भात ओबीसी समाजाचे नेते आणि प्रतिनिधी मला भेटले. तसेच याविषयावर मंत्री छगन भुजबळ यांच्याशी देखील माझे बोलणे झाले आहे. त्यानंतर त्यांच्या ज्या काही शंका आणि संभ्रम होता, तो आता दूर झाला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर छगन भुजबळ हे कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

One Comment on “सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार ही अफवा – मुख्यमंत्री शिंदे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *