बारामती, 21 नोव्हेंबरः बारामती नगरपालिका हद्दीतील जळोची गावांमधील साठवण तलावाचे खोदकाम वेगाने चालू आहे. मात्र असे असताना बारामतीमधील गौतमबाग ते बोरावके वस्ती येथील नियोजित शंभर फुटी प्रस्तावित रस्ता हा अतिशय धूळग्रस्त झाला आहे.
तलाव खोदकाम प्रक्रिया अतिशय वेगाने काम करत असल्यामुळे तेथून सर्रास जड वाहनांची वाहतूक ही रात्रंदिवस चालू आहे. सदर कच्या रस्त्या वरून प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. त्याचा जळोची येथील सामान्य नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जळोची भागातील ग्रामस्थांचे जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे. तसेच तेथील रहिवाशांना जीव मुठीत धरून त्या कच्या रस्त्याने वाहतूक करणे भाग पडत आहे.
आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
या बाबतची बारामती नगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली आहे. मात्र तरी सुद्धा नगरपालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी या कच्चा रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.
जिल्ह्यात वीज चोरांविरोधात महावितरण आक्रमक
One Comment on “साठवण तलावाच्या खोदकामामुळे बारामतीचा रस्ता झाला धुळग्रस्त!”