बारामती, 9 ऑक्टोबरः बारामतीमध्ये 66 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने बारामती बौद्ध युवक संघटनेच्या वतीने बौद्ध समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याला लाँग मार्च चे प्रणेते, पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे (सर) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
इंदापुरात रासपचे शक्ती प्रदर्शन
सदर मेळावा हा बारामती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे रविवारी 9 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते होणार आहे. तरी सदर मेळाव्याला बौद्ध समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बारामती बौद्ध युवक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.