बारामती नगर परिषदेच्या वाढीव हद्दीची समस्या ‘जैसे थे’च!

बारामती, 6 सप्टेंबरः बारामती नगर परिषदेची हद्दवाढ होऊन यात तांदुळवाडी, रुई, जळोची आणि बारामती ग्रामीण भाग आदी भागांचा समावेश करण्यात आला आहे. सदर नगर परिषदेची हद्दवाढ होऊन तब्बल 10 वर्षे झाली आहेत. मात्र सदर भागांमधील पायाभूत सुविधा आणि समस्या या ‘जैसे थे’च असल्याचे चित्र आहे.

मुलगा हरविला आहे….

गेल्या दोन महिन्यापासून नगर परिषदेच्या हद्दीतील रुई भागातील अभिमन्यू कॉर्नर ते रुई या रस्त्यावर स्ट्रोम वॉचरचे काम सुरु होतं. या कामामुळे सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मात्र सदर कामाचे ठेकेदार हिंगणे यांच्याकडून रस्त्याची दुरुस्तीचं काम करणं अपेक्षित असतानाही ते झालेले नाही.

दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून बारामतीसह रुई भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसामुळे अभिमन्यू कॉर्नर ते रुई मार्गावर चिखलच झाला आहे. या चिखलामुळे अनेकजण घसरून पडले देखील आहेत. तर काहीजण जखमीसुद्धा झाले आहेत. यामुळे सदर रस्त्यावरून जा ये करताना येथील परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *