पुणे, 09 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात आज पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकरांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या उष्णतेमुळे तेथील नागरिक चांगलेच हैराण झाले होते. अशातच आज मुसळधार पाऊस पडल्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. यासोबतच नागपुर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, बुलढाणा यांसारख्या शहरात देखील आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
#WeatherUpdate
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 9, 2024
हवामान अंदाज : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता… pic.twitter.com/FAWx9SP4Dr
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 kmph) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 9, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/EGGvZknH4P
आज या जिल्ह्यांना इशारा
तत्पूर्वी, हवामान विभागाने आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, आजच्या दिवशी पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, लातूर, अमरावती, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, यवतमाळ, वर्धा, या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
उद्या या जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट
तसेच हवामान विभागाने उद्या देखील पावसाचा अलर्ट जारी केला आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, नांदेड, लातूर, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, सध्या पडत असलेल्या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होत आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.