‘त्या’ पारधी अनाथ मुलांसाठी पोलिसांनी खुलं केलं शिक्षणाचे दार!

बारामती, 26 जूनः (प्रतिनिधी- दयावान दामोदरे) देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्षे पुर्ण झाली, मात्र, अजूनही अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडणारा पारधी समाज विकासापासून कोसो दूर आहे. पारधी समाज हा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेलाच राहिला आहे. यामुळे या समाजातील अनेकांकडे राहण्यासाठी साधे घर देखील नाही. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून कोणताही व्यवसाय नाही.

पारधी समाजातील कवचितच अधिकारी झालेले आपण पाहतो. आधुनिक युगातही वाडी, वस्त्या व तांड्यांमध्ये उघड्यावरच राहणार्‍या पारधी समाजाला आपण पाहतो. पारधी म्हंटलं की, गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत, असाच समज इतरांमध्ये असतो. यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या समाजातील काहीजण केवळ शिक्षणाच्या जोरावर हळूहळू आपली प्रगती साधत आहे.

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अनुसूचित जातीमधील माने कुटुंब उद्ध्वस्त!

भिगवण परिसरात दोन लहान मुले संशयास्पद फिरताना पोलीस नाईक महेश उगले, दीपक वेताळ यांना दिसले. त्या मुलांना भिगवण पोलीस स्टेशनमध्ये आणून भिगवण स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक दडस यांच्या समोर उभे केले. त्या मुलांची विचारपुस केल्यानंतर त्यांना समजले की, उमेश भानुदास भोसले आणि करण भानुदास भोसले हे दोघे भाऊ असून इंदापूर तालुक्यातील पोंदवडी गावातील आहेत. त्यांच्या आईचे काही दिवसांपुर्वी निधन झाले आहे. त्यांचे वडिल असूनही नसल्यासारखे आहे, कारण ते त्यांचा संभाळ करत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर वनवन भटकण्याची वेळ आली.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मुर्टी शाळेत दिंडी सोहळा साजरा

जर या मुलांना असेच सोडले तर पारधी समाजातील मुले म्हटले तर यांना कोणीही जवळ करणार नाही, या उलट ते पोटाची खळगी भरण्यासाठी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतील. या विचारामुळे भिगवण पोलिसांनी त्या पारधी समाजातील अनाथ मुलांकरीता शालेय शिक्षणाची दारे खुली केली. उमेश आणि करण या दोन भावांना वर्षभराचे शालेय साहित्य आणून दिले आणि त्यांना शाळेत प्रवेश देखील मिळवून देत भिगवण पोलिसांनी वर्दीतील देव माणसाची प्रचीती पुन्हा एकदा दाखवून दिली. या घटनेनंतर भिगवण पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

2 Comments on “‘त्या’ पारधी अनाथ मुलांसाठी पोलिसांनी खुलं केलं शिक्षणाचे दार!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *