पोलिसांनी दिले त्या गाईंना जीवनदान

बारामती, 31 ऑगस्टः फलटण येथून इंदापूरच्या दिशेने पिकअप टेम्पो (एमएच 42 ए क्यू 4013) पांढरा रंगाच्या गाडीमधून काही गाई कत्तल करण्यासाठी घेऊन जात आहेत, अशी खात्रीशीर बातमी बारामती शहर पोलिसांना 29 ऑगस्ट 2022 रोजी गोरक्षकामार्फत मिळाली. सदर बातमीवरून बारामती शहर पोलिसांनी तात्काळ त्या पिकअप गाडीचा पाठलाग केला. सदरचा पिकअप भरधाव वेगाने इंदापूरकडे जात असताना पिंपळी येथील मॅक डोनाल्ड कंपनी जवळ पकडला. सदर पिकअप गाडीत दोन जर्सी व एक गावरान गाई कत्तलीसाठी घेऊन जात असताना अक्षय वाघमोडे (वय 25, रा. गोतंडी तालुका इंदापूर) हा पिकप चालक आणि गणेश भोंग (वय 29, रा. निमगाव केतकी तालुका इंदापूर) हे सदरच्या गाई कत्तलसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.

अस्तरीकरण विरुद्ध आंदोलनात राजू शेट्टी यांची एन्ट्री

यातील एक गाई गाभण होती. सदर पोलीस कारवाईत दीड लाख रुपयांच्या गाई आणि पिकअप गाडी अडीच लाख रुपये असा तब्बल चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केली. यानंतर जीवनदान दिलेल्या तीन गाईंना गो शाळेत पाठवण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, बंडू कोठे, तुषार चव्हाण यांनी केली.

या कारवाईत अटक केलेले संशयित आरोपी यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित कायदा कलम 5 ,9 प्रमाणे कारवाई केली. तसेच प्राण्यांना छळवणुकीचा अधिनियम कलम 11 प्रमाणे सुद्धा कारवाई केली. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काळे यांच्याकडे वर्ग करण्यात आला. सदर आरोपींना 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी बारामती येथील न्यायालयात हजर केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी संशयित आरोपींच्या विरोधात पोलीस कोठडीसाठी न्यायालयात युक्तिवाद केला. आरोपींनी सुद्धा सदर गाई गाभण असून ती पाळण्यासाठी घेऊन जात आहे, असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रदीप काळे यांनी उत्तमरित्या सरकारी अभिवक्ता सोनवणे यांच्या मदतीने युक्तिवाद करून आरोपींचा युक्तिवाद खोडून काढला. सदर आरोपींना न्यायाधीश पाटील मॅडम यांनी तीन दिवस पोलीस कोठडी मंजूर केले. या कारवाईनंतर या मागे मोठी गो तस्करी करणारी टोळी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *