बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळले

बारामती, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) बारामतीमध्ये प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि. 22) सकाळी घडली. हे विमान बारामती मधील सह्याद्री काऊ फार्म परिसरात कोसळले. या विमानात प्रशिक्षणार्थी आणि पायलट ट्रेनर हे दोघे होते. या अपघातात दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट

या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विमान लॅण्डीग करत असताना हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान हे कोसळण्यात आलेले विमान रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग सेंटरचे आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 4 दिवसांपूर्वी याच ट्रेनिंग सेंटरच्या विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये देखील 2 जण जखमी झाले होते.

तेज चक्रीवादळाचा जोर वाढणार!


दरम्यान या विमान अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे वैमानिक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बारामती परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अशा विमान अपघातांच्या घटना का घडत आहेत? याचा तपास करण्याची तसेच या दुर्घटना रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

One Comment on “बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळले”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *