‘द प्लॅन’ नाट्यप्रयोग दिल्लीच्या रंगमंचावर सादर

पुणे, 22 जुलैः ‘स्नेह पुणे’च्या नाट्य कलाकारांना दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’द्वारे आयोजित देशातील एका अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘भारत रंग महोत्सव’ या अत्यंत मानाच्या रंगमंचावर 20 जुलै रोजी नाट्यप्रयोग सादर करण्याचा सन्मान प्राप्त झाला. ‘स्नेह-पुणे’ तर्फे ‘द-प्लॅन’ या नाट्यप्रयोगात संस्कार भारती-पुणे महानगरचे कलाकार सहभागी झाले होते.

निराश्रीत गरोदर महिलेसह तिच्या चार अपत्यांना महिला वसतिगृह दाखल

विशेष बाब म्हणजे केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी ‘द प्लॅन’च्या प्रयोगाला पूर्ण वेळ देऊन हे संपूर्ण नाटक पाहिले. तसेच नाटकांच्या लेखन आणि दिग्दर्शनाची कौतुक केले. यासह या नाटकाचे प्रयोग देशभरात होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. तसेच प्रयोगाला उपस्थित साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी अभिनेता, दिग्दर्शक योगेश सोमण यांचे नाटकाबद्दल विशेष कौतुक केले आणि एक उत्तम कलाकृती बघण्यासाठी बोलवल्याबद्दल धन्यवाद दिले.

यंदा गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम धुमधडाक्यात

यावेळी एनएसडीचे संचालक डॉ. रमेश गौड, संस्कार भारती अखिल भारतीय संघटन मंत्री दादा गोखले, समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, सुप्रसिद्ध नाटककार पद्मश्री दया प्रकाश सिन्हा, पद्मश्री राम बहादुर राय आदी मान्यवर उपस्थित होते. दिल्लीत नाट्यप्रयोग सादर झाल्याबद्दल संस्कार भारती-पुणे महानगरतर्फे कलाकारांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *