आरपीआय (आ) च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

बारामती, 20 जुलैः बारामती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची 19 जुलै 2022 रोजी संध्याकाळी बैठक संपन्न झाली. सदर बैठक ही आरपीआय (आ)चे पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या सूचनेनुसार तालुका आणि जिल्हा समितीच्या अशासकीय पदांवर तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्यास उत्सुक आणि योग्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी याकरीता बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांची नावे निश्चित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बारामती नगर परिषदेकडून नागरिकांना जाहीर आवाहन

सदर बैठकीला जिल्हा सचिव सुनिल शिंदे, विजय (डॅडी) सोनवणे, जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र (पप्पू) सोनवणे, जिल्हा महिला कार्याध्यक्षा रत्नप्रभा साबळे, तालुकाध्यक्ष मधुकर मोरे, तालुका सरचिटणीस संजय वाघमारे, महिला शहराध्यक्षा पूनम घाडगे, यासह मोईन बागवान, बाळासाहेब सरतापे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *