मुंबई, 22 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यंदाची ही निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यासाठी विविध राजकीय पक्षांची सध्या मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सयाजी शिंदे, रुपाली चाकणकर यांसारख्या 27 नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. हे सर्व नेते आता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या तसेच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसणार आहेत.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1848391823070490761?t=mX8xH7eJoXMA1MfEmUXeCg&s=19
अजित पवारांचे ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सोशल मीडियावरून ही यादी प्रसिद्ध केली आहे. “महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..!” विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.” असे अजित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी –
1) अजित पवार
2) प्रफुल पटेल
3) सुनील तटकरे
4) छगन भुजबळ
5) दिलीप वळसे पाटील
6) धनंजय मुंडे
7) हसन मुश्रीफ
8) नरहरी झिरवाळ
9) आदिती तटकरे
10) नितीन पाटील
11) सयाजी शिंदे
12) अमोल मिटकरी
13) जल्लाउद्दीन सैय्यद
14) धीरज शर्मा
15) रुपाली चाकणकर
16) इद्रिस नायकवडी
17) सूरज चव्हाण
18) कल्याण आखाडे
19) सुनील मगरे
20) महेश शिंदे
21) राजलक्ष्मी भोसले
22) सुरेखा ठाकरे
23) उदयकुमार आहेर
24) शशिकांत तरंगे
25) वासिम बुऱ्हाण
26) प्रशांत कदम
27) संध्या सोनवणे