महावितरणचा हलगर्जीपणा आदित्यच्या जीवावर बेतला; 70 ते 75 टक्के भाजला

बारामती, 14 जूनः (प्रतिनिधी- अभिजीत कांबळे) जून महिन्याच्या सुरुवातीलाच बारामती शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका शाळकरी मुलावर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जीवावर बेतलं आहे. एका शाळकरी विद्यार्थ्याला शॉक लागल्यामुळे तो 70 ते 75 टक्के भाजला आहे. आदित्य भारत चौगुले असे त्या शाळकरी विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या त्याचावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. मात्र आदित्यची प्रकृती सध्या खूपच नाजूक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बारामती शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या आमराई परिसरातील झगडे गॅरेज जवळील चिमण फाटा शेजारील विद्युत डेपोला 12 जून 2023 रोजी, सायंकाळी 5.30 च्या सुमारास आदित्य चौगुले या शाळकरी विद्यार्थ्याला शॉक लागल्याची घटना घडली. विद्युत डेपोची दरवाजे उघडे असल्याने आदित्यला शॉक लागला. या घटनेत आदित्य तब्बल 70 ते 75 टक्के भाजला आहे. मात्र या घटनेकडे कुंभकर्णाच्या झोपीचे सोंग घेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांकडून कानाडोळा करण्यात येत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री येणार बारामतीत…

आतापर्यंत महावितरण अधिकाऱ्यांकडून नैतिक जबाबदारी म्हणून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच पीडित आदित्यला महावितरणाकडून कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. उलट सदर घटनेनंतर आतापर्यंत उघडे असणारे विद्युत डेपोचे दरवाजे बंद करून काहीच घडले नसल्याचे दाखवत आहेत.

मात्र महावितरणच्या या सर्व हलगर्जीपणामुळे तो शाळकरी मुलगा आदित्य चौगुले सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, याची साधी चौकशीही महावितरणाकडून बसवण्यासाठी तजवीज करण्यात आलेली नाही. याआधीही शॉक लागून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र महावितरणाने ते सर्व कांड दुर्लक्षित करून आतापर्यंत कसेबसे जिरवले आहेत. मात्र या घटनेनंतर महावितरणावर कोणती कारवाई होईल का?, की ही घटना देखील अशीच जिरवली जाणार?, समान्य नागरिकांचे बिले थकली की महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी लगेच कारवाई करण्यासाठी पुढे येतात. मात्र सामान्य व्यक्तींसोबत शॉक लागण्याच्या घटना घटल्या की महावितरणाकडून हात वर केले जातात. या सर्व कारणांमुळे महावितरणाविरोधात सामान्य जनतेत आता रोष निर्माण झाला आहे.

मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर आगीचा तांडव; 4 जणांचा होरपळून मृत्यू (व्हिडिओ)

संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची आणि आदित्य चौगुले या शाळकरी विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी प्रबुद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत कांबळे, आरपीआय (आ) पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र(पप्पू) सोनवणे, संस्थापक अध्यक्ष सम्राट गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दयावान दामोदरे तसेच प्रबुद्ध युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आणि मागण्या पुर्ण न झाल्यास महावितरण विरोधात बारामतीत आरपीआय आणि प्रबुद्ध युवक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सम्राट गायकवाड, रविंद्र (पप्पू) सोनवणे, अभिजीत कांबळे यांनी दिला आहे.

2 Comments on “महावितरणचा हलगर्जीपणा आदित्यच्या जीवावर बेतला; 70 ते 75 टक्के भाजला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *