बोरकरवाडी येथील तलाव भरला 100 टक्के

बारामती, 11 सप्टेंबरः बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथील तलाव 100 टक्के भरला आहे. बोरकरवाडी तलाव हा एमआय टँक आहे. तसेच सदर तलाव हा नाझरे प्रकल्प अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. या तलावाची क्षमता ही 42.90 एमसीएफटी इतकी आहे. या तलावाच्या पाण्याचे आज, 11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 च्या सुमारास पूजन करण्यात आले.

बारामती लोकसभा रासप संपुर्ण ताकदीने लढणार

यावेळी राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जि. प. सदस्य भरत खैरे, जेष्ठ नेते बबनराव बोरकर, उपसरपंच दत्ता कदम, संतोष बोरकर, राजाभाऊ बोरकर, हरिभाऊ बोरकर, शिवाजी बडदे, मधुकर बोरकर, शिवाजीराव माने, बाळासाहेब बोरकर, विलास बोरकर, अतुल बोरकर, श्रीरंग बोरकर, बबन बोरकर, वसंत कदम, प्रकाश बोरकर, दादा बोरकर आदी ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्याचे विरोध पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार तलावाच्या सांडवा आणि भराव परिसरातील सुधारणेसह स्वच्छता करण्यात आली होती. सदर तलाव भरल्यामुळे या पाण्याचा बोरकरवाडी, खंडूखैरेवाडी, चांदगुडेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी आदी गावांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *