बारामतीत बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

बारामती, 8 ऑगस्टः बारामती शहरासह तालुक्यात क्षमतेपेक्षा जास्त भरलेली जड वाहनांची वाहतूक सर्रास सुरु आहे. याची प्रचीती नुकतीच समोर आली आहे. एका डंपरने अक्षरशः मेंढ्यांना चिरडले. या अपघातात 18 मेंढ्यांचा जीव घेतला तर 15 मेंढ्या गंभीर रित्या जखमी अवस्थेत आहे. सदर अपघात माळावरच्या देवीच्या शेजारील रिंग रोडवर 5 ऑगस्ट 2022 रोजी झाला आहे.

गाळप परवाना अर्ज करणं आता कारखान्यांना बंधनकारक

सदर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांची भरपाई दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज (खडी) भरलेल्या डंपरमुळे सदरचा अपघात झाला आहे. सदर डंपर हा सातारच्या वाई तालुक्यातील बावधन गावातील असून जितेंद्र लक्ष्मण मांढरे यांच्या नाववर त्याची नोंद आहे. तसेच डंपर हा संसर येथील एका इसमाला विकला असून त्याच्या नावे अद्याप झालेला नाही.

बारामतीत भरधाव हायवाने 18 मेंढ्यांना चिरडले

मात्र या डंपर विषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे सदर डंपर वाहनाचा इन्शुरन्स (विमा) मुदत ही मार्च 2022 रोजी संपलेला असल्याची माहिती आरटीओकडून सांगण्यात आली आहे.

दौंड तालुक्यात भात शेतीचा प्रयोग यशस्वी!

यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. बारामती तालुक्यात सदर वाहने ही कुणाच्या आशीर्वादाने चालवले जातात? या अपघातामुळे सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तर प्राण्यांची क्रूर्तेबद्दल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुन्हा का नोंदविला नाही? सदर अपघातानंतर महसूल विभागाने तपास का केला नाही? सदर डंपरचा इन्शुरन्स (विमा) देखील संपलेला आहे. मात्र इतके महिन्यात या सारख्या अनेक वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई का केली गेली नाही? सदर घटनेचा महसूल विभाग, पोलीस प्रशासन, परिवहन विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग यांच्यात समन्वय नसल्याचे प्रखरतेने जाणवत आहे. त्यामुळे प्रशासन मनुष्य हानीची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *