बारामती, 6 जुलैः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी गाव परिसरातील मोरांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांना या मोरांचा फायदा होत आहे. मुर्टी परिसरातील वाघाळे येथील माजी पोलिस निरीक्षक रमेश भोसले यांच्या शेतामध्ये किशोर चव्हाण यांना जखमी अवस्थेत मोर दिसला. त्यांनी तातडीने प्रविण भोसले यांना बोलवून घेत जखमी मोराला घरी आणले.
मयुरेश्वर आयटीआयच्या 40 विद्यार्थ्यांची महिंद्रा कंपनीत निवड
यानंतर प्रविण भोसले यांचे वडील रमेश भोसले यांनी जखमी मोराला पाणी पाजून वन अधिकारी पाचपुते यांना फोन करून जखमी मोराची माहीती देत तात्काळ मुर्टीमध्ये येण्याची विनंती केली.
वन अधिकारी पाचपुते यांनी जखमी मोराची तपासणी केली असता मोराच्या डाव्या पायाला उभी चिर पडल्याचे दिसून आले. जखमी मोराला प्राथमिक उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती वन अधिकारी पाचपुते यांनी सांगितली.
बारामतीत अजित पवारांसाठी भाजपकडून बॅनरबाजी; कार्यकर्ते मात्र संभ्रमात
One Comment on “जखमी मोराला भोसले परिवारांकडून जीवदान”