बारामती, 10 ऑक्टोबरः बारामती हा वैद्यकीय केंद्र म्हणून विकसित होत आहे. अत्याधुनिक व तज्ज्ञ डॉक्टरांची फौज बारामतीकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. अनेक मोठ मोठे दवाखाने उभे राहत आहेत. परंतु बारामतीतील सर्वसामन्य रुग्णांना उच्च दर्जाचे मापक दरात सुविधा मिळत नाहीत. माल प्रॉक्टिसिंगच्या नावाखाली बारामतीत रुग्णांची सर्रास लुट चालू आहे. कट प्रॉक्टिसिंगच्या नावाखाली अनावश्यक चाचण्या करण्यास रुग्णांना भाग पाडले जात आहेत. त्यामुळे डॉक्टर लोकांचे आरोग्य बिघडले काय? असा प्रश्न पडला आहे.
आमराई विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा!
सेवेकडे व्यवसाय म्हणून पाहणाऱ्या डॉक्टरांनी शासनाचे विविध योजनांची अंमलबजावणी करावी, ही मापक अपेक्षा रुग्णांची आहे. परंतु पोटभरू डॉक्टर लोकांना लोकहितापेक्षा स्वःहित लक्षात घेऊन अनेक बेकायदेशीर मार्गाने पैसे कमावताना बारामतीमध्ये पाहिले जात आहे. रुग्णालयाच्या दर्शनीय ठिकाणी रुग्ण हक्क फलक लावला जात नाही. तर जाणून बुजून पक्की बिले दिली जात नाही, उपचारांवरील खर्चांचा तपशिल लावला जात नाही. त्यामुळे रुग्णांचे आर्थिक व मानसिक पिळवणूक होते. या विरुद्ध कायदेचे अंमलबजावणी करणारे वैद्यकीय प्रशासक अर्थपुर्ण संबंधातून डॉक्टरांच्या बेकायदेशीर कृत्यांना मदत करत आहेत व प्रोत्साहन देत आहेत.
वंचितच्या तीन शाखांचे बारामतीत उद्घाटन संपन्न!
नुकतेच बारामतीमधील एका बालरोगतज्ज्ञ दवाखान्यात रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी यांच्यात वाद-विवाद होऊन सदरचे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याचे समजते.
One Comment on “बारामतीमधील डॉक्टरांचे आरोग्य बिघडले!”