मुंबई, 29 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने मराठा आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. त्यानूसार, मंत्रिमंडळ उपसमितीची सोमवारी (30 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता एक बैठक पार पडणार आहे. तर ही बैठक मंत्रालयातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण संदर्भात या बैठकीत कोणता तोडगा निघतो? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
गतविजेत्या इंग्लंडशी आज टीम इंडियाचा सामना
दरम्यान, राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक तपास करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. तर या समितीने आतापर्यंत केलेल्या तपासणीचा अहवाल सोमवारी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तर राज्य सरकारने दोनच दिवसांपूर्वी संदीप शिंदे यांच्या या समितीला कामकाज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत या समितीबाबत राज्य सरकार कोणता निर्णय घेणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 5 धावांनी थरारक विजय
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षण लागू व्हावे यासाठी, मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही, तर तोपर्यंत मी माझे उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार जरांगे पाटलांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात अनेक मराठा बांधवांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी आपण मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचा शब्द दिला आहे. मराठा समाजाच्या तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षण संदर्भात आता कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
One Comment on “मराठा आरक्षणसंदर्भात सरकार बैठक घेणार”