अतिरिक्त पोलीस कार्यालयात नवीन वसुली अधिकाऱ्याचे ‘गोरख’ धंदे!

बारामती, 11 एप्रिलः बारामती अतिरिक्त पोलीस कार्यालयात पोलीस वसुली अधिकाऱ्याची भरती झाल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. सदर वसुल अधिकारी कुठल्याही कर्तव्यावर नसतो किंवा कुठलीही शोध मोहीमेमध्ये त्या अधिकाऱ्याचे नाव येत नाही. कुठलेही पोलीस प्रसिद्ध पत्रकामध्ये त्याचे नाव नसते. कधीही कुठला आरोपी पकडला किंवा पोलीस धाडीमध्ये हा अधिकारी सहभागी नसतो. मग हा वसुली अधिकारी नेमकं काय काम करतो? इंदापूर, बारामती, दौंड या तालुक्यात वाळूंचे कार्ड चालविणे, जनावरांच्या बाजारामध्ये कार्ड चालविणे, जुगारींच्या अड्ड्यांवर वैयक्तिक गाठीभेटी देणे, चोरून चाललेले मटक्यांचे धंदे, हातभट्टी दारूंचे धंदे असे चालक अन् मालक यांच्या संपर्कात राहून वसुलीचे काम करणे, अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विक्री, साठवणूक व वाहतूक यांच्या आशिर्वादाने चालतो.

मधल्या काळात, अन्न व औषध प्रशासनाने हस्तक्षेप करून लाखों रुपयांचा गुटखा पकडला आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत जी माहिती मिळाली नाही, ती माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळते. त्यातच पोलीस कर्मचाऱ्यांचे अपयश आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर महामार्ग पोलीस जे काम करत नाहीत, ते वसुलीचे काम हे वसुली अधिकारी मासे करीत आहेत. राष्ट्रपती पदकासाठी वसुली अधिकाऱ्याचे माननीय श्रीमान पवार साहेब यांची शिफारस गुटखा, मटका, जुगार, हातभट्टी ही बेकायदेशी धंदेवाले महामंडळाने राष्ट्रपतींकडे मागणी केल्याचे समजते आणि कर्तव्य शून्य पवार साहेबांना हा पुरस्कार मिळाला तर आश्चर्य वाटू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *