तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला; भारत पहिल्या डावात 5 बाद 326 धावा

राजकोट, 15 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सध्या राजकोट येथे खेळविण्यात येत आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने 5 बाद 326 धावा केल्या आहेत. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा 131 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने नाबाद 110 धावांची खेळी केली. तर सरफराज खानने कारकिर्दीतील पदार्पणाच्या सामन्यात 48 चेंडूत 62 धावा केल्या.

https://twitter.com/BCCI/status/1758095025940935096?s=19

रोहित-जडेजाची 204 धावांची भागीदारी!

तत्पूर्वी, या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 33 धावांवर तीन विकेट गमावल्या. यामध्ये भारताचे यशस्वी जैस्वाल (10), शुभमन गिल (0) आणि रजत पाटीदार (5) हे तिघे लवकर बाद झाले. त्यानंतर रोहित शर्मा आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजा यांनी चांगली फलंदाजी करीत भारताचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. मात्र, रोहित शर्मा 131 धावांवर बाद झाला.

सरफराजची तडाखेबाज 62 धावांची खेळी

रोहित शर्मा बाद झाल्यावर सरफराज खान फलंदाजीला आला. त्याने यावेळी आक्रमक फलंदाजी केली. सरफराजने 48 चेंडूत 62 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. मात्र, तो चांगली फलंदाजी करतोय असे वाटत असतानाच सरफराज दुर्दैवाने धावबाद होऊन परतला. त्यानंतर कुलदीप यादव नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारताची धावसंख्या 5 बाद 326 इतकी झाली आहे. यावेळी रवींद्र जडेजा 110 आणि कुलदीप यादव 1 धावांवर नाबाद खेळत आहेत. या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडकडून मार्क वुडने 3 आणि टॉम हार्टले याने 1 विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *