महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर! ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा

मुंबई, 09 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात येत्या 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1777623293517791492?s=19

सांगलीची जागा शिवसेनेला!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21 जागांवर, काँग्रेस 17 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर लढणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सांगली, मुंबई दक्षिण मध्य आणि भिवंडीच्या जागेवरून वाद सुरू होता. या जागा काँग्रेस पक्षाला मिळालेल्या नाहीत. या जागा वाटपात सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य मतदार संघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाली आहे. तर भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आल्याचे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1777600417507250489?s=19

पाहा कोणत्या पक्षाला किती जागा?

शिवसेना ठाकरे गट 21 जागा
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई पूर्व.
काँग्रेसच्या 17 जागा
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर
राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *