बारामती, 4 ऑक्टोबरः बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन 2022-23 चा 61 वा गळीत हंगामाला 9 ऑक्टोबर 2022 रोजी सुरुवात होणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार मकरंद पाटील, संजय जगताप, दिपक चव्हाण, माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, पीडीसीसी बँकेचे संचालक संभाजी होळकर, त्तात्रय येळे आदींची प्रमुख उपस्थित असणार आहे.
यावेळी सोमेश्वर साखर कारखाना संचलित श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उभारलेल्या गर्ल्स होस्टेल, एमबीए कॉलेज, इंजीनअरींग कॉलेज, सोमेश्वर सार्वजनिक वाचनालय तसेच सोमेश्वर कारखाना कामगार पतपेढी या सर्व संस्थांच्या नुतन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यासह कारखान्याच्या को जन विस्तार वाढ प्रकल्पाची सुरुवात, कारखाना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन, कारखाना कामगार वसाहतीमधील 3 इमारतींचे उद्घाटन आणि जाहीर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली.
कारखान्याचा सन 2022-23 चा 61 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांसह त्यांच्या सुवद्य पत्नी, व्हाईस चेअरमन आनंदकुमार होळकर यांसह त्यांच्या सुवद्य पत्नी यांच्या हस्ते उद्या, 5 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता आयोजित केला आहे. गाळप हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जगताप यांनी दिली.