बारामती प्रीमियर लीगच्या थरारक पर्व 4 ला उद्यापासून सुरुवात!

बारामती, 18 नोव्हेंबरः बारामती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर उद्या 19 नोव्हेंबर 2022 रोजी पासून बारामती प्रीमियर लीग (BPL)च्या थरारक अशा पर्व 4 ला सुरुवात होत आहे. 19 नोव्हेंबर हा स्पर्धेचा पहिला दिवस असणार आहे. उद्या 19 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून टेनिस बॉलच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा KGF किंग विरूद्ध मित्र प्रेम पॅन्थर्स या संघात होणार आहे.

आमराई बॉईज क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन बारामती प्रीमियर लीग पर्व 4 चे उद्घाटन सोहळा उद्या दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पार पडणार आहे. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, पुणे मनपाचे सहआयुक्त संदीप कदम, आपीएस अनिकेत फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?

टेनिस बॉलवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या BPL-4 स्पर्धेत बारामती शहरासह तालुक्यातील खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे. या BPL-4 ऑक्शनमध्ये तब्बल 16 संघांकडून बोली लावून आपापल्या संघात खेळाडूंची निवड केली आहे. या BPL-4 स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्हवर होणार आहे.

One Comment on “बारामती प्रीमियर लीगच्या थरारक पर्व 4 ला उद्यापासून सुरुवात!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *