निवडणूक आयोग आज विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार! कोणत्या राज्यांत निवडणूका?

दिल्ली, 15 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.16) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग काही राज्यांतील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. तर कोणत्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल? हे मात्र निवडणूक आयोगाने अद्याप सांगितलेले नाही. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठवले आहे.

https://x.com/ANI/status/1824278841659125991?s=19

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक जाहीर होणार?

यापूर्वी सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाचे पालन निवडणूक आयोगाला करावे लागणार आहे. त्यानुसार, निवडणूक आयोगाने मागे जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला होता. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हरियाणा, झारखंड, महाराष्ट्रात निवडणूका?

तर दुसरीकडे निवडणूक आयोग हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यांत देखील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. या तिन्ही राज्यांत देखील याच वर्षी विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. यामधील हरियाणा सरकारचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर समाप्त होणार आहे. तर महाराष्ट्र सरकारचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तसेच झारखंड सरकारचा देखील कार्यकाळ येत्या काही महिन्यांत समाप्त होणार आहे. त्यामुळे या राज्यांत विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. परंतु, निवडणूक आयोग आजच्या पत्रकार परिषदेत कोणत्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर करणार? याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *