पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील मतमोजणी साठी निवडणूक आयोग सज्ज! उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

पुणे, 03 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी म्हणजेच 4 जून रोजी होणार आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान 1 जून रोजी समाप्त झाले. यंदा देशातील लोकसभेच्या एकूण 542 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान झाले आहे. या निवडणुकीत 8 हजार 360 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला उद्या म्हणजेच मंगळवारी होणार आहे. आता या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/Info_Pune/status/1797647182419612014?s=19

येथे मतमोजणी होणार

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या 4 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ या 4 लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 3 ठिकाणी होणार असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगांव पार्क एफसीआय गोदामात होणार आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या गोदामात होणार आहे. तर मावळ लोकसभा मतदार संघाची मजमोजणी पुण्यातील बालेवाडी स्टेडीयम येथे पार पडणार आहे.

https://twitter.com/InfoDivPune/status/1797561417878671736?s=19

https://twitter.com/InfoDivPune/status/1797597680098746842?s=19

या पार्श्वभूमीवर, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज कोरेगांव पार्क एफसीआय गोदाम, रांजणगाव येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या गोदाम आणि बालेवाडी स्टेडीयम येथील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतमोजणी केंद्रातील सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच याप्रसंगी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये आयोजित मतमोजणी प्रशिक्षणात पुणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

https://twitter.com/Info_Pune/status/1797647182419612014?s=19

मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अखिलेश कुमार सिन्हा यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघासाठी पवन कुमार परंकुश यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मोहम्मद हारूण यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मोईनुद्दीन खान यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

निकालात कोण बाजी मारणार?

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात यंदा लोकसभेची निवडणूक पार पडली. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्यात लढत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात सामना रंगणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. तर मावळमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल काही तासांतच लागणार आहे. त्यामुळे या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *