देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडल्याने वाढली चिंता

नवी दिल्ली, 22 मेः भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट BA.4 आणि BA.5 सापडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. इंडियन सार्स कोव्ह-2 जिनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) या संस्थेकडून या नवा व्हेरियंटची पुष्टी करण्यात आली आहे. हे दोन्ही व्हेरियंट हे ओमायक्रॉन या व्हेरियंटचे सब-व्हेरियंट आहेत. दरम्यान,  देशात गेल्या वर्षी ओमायक्रॉन व्हेरियंटने धुमाकूळ घातला होता. आता त्याचे सब व्हेरियंट सापडल्याने आणखीन चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हळूहळू रुग्ण संख्या वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता BA.4 आणि BA.5 हा नवा व्हेरियंट सापडल्याने काही प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

संस्थेच्या अहवालानुसार, ओमायक्रॉनच्या BA.2 या व्हेरियंटप्रमाणेच या BA.4 आणि BA.5 ची लक्षणे आहेत. या व्हेरियंटचा पहिला रुग्ण हा तामिळनाडू आणि दुसरा रुग्ण हा तेलंगणामध्ये सापडला आहे. या व्हेरियंटपासून सुरक्षित रहायचे असेल, तर कोरोना लसीच्या बुस्टर डोसची मात्रा घेणे आवश्यक असल्याचे इंडियन सार्स कोव्ह-2 जिनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) कडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *