बारामती शहरातील गर्दीच्या चौकांपैकी एक तीन हत्ती चौक आहे. या चौकात कामगार कट्टा असल्याने सकाळी कामगार आणि कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तसेच या चौकातून दिवसभर शाळा, कॉलेजसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये- जा करताना दिसत असतात. यासह बारामती नगर परिषदेची इमारत याच चौकाजवळ असल्याने सदर चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसते. तसेच चौकातील असणाऱ्या नगर परिषदेच्या गाळ्यांमध्ये अनेक नागरिक त्यांच्या कामानिमित्त पदपाथच्या शेजारी आपापली दुचाकी पार्क करीत असतात. यामुळे दिवसभर या चौकात पार्किंगची गर्दी दिसून येते. यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होताना दिसते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत रक्तदान शिबीर
ही बाब लक्षात घेऊन, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक सकाळपासूनची गर्दी कमी करण्याच्या हेतून चौकात वाहतुक पोलिसाची नेमणूक केली आहे. यामुळे तीन हत्ती चौकात आज, 27 जुलै 2022 रोजी, सकाळपासून एकही वाहन पार्किंग नसल्याचे चित्र होते. तसेच वाहतूक पोलिसांनाही नागरिकांचे चांगलेच सहकार्य लाभले. यामुळे सकाळी बारामती नगर परिषदेच्या नव्या इमारतीवरून काढलेल्या नयन रम्य छाया सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. जर सर्वांनी असेच नियमात पार्किंग केले तर सर्वांना ते फायद्याचे राहणार आहे.