बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट दोन महिन्यांपासून रचला जात होता, आरोपींच्या चौकशीतून माहिती समोर

मुंबई, 13 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (दि.12) गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी सध्या फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत. या फरार आरोपीला लवकरच पकडण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारात 9.9 एमएम पिस्तुलचा वापर करण्यात आला आहे.

https://x.com/AHindinews/status/1845310033212694823?t=BhFPYPOilbcf3Tvr7ry6Eg&s=19

https://x.com/AHindinews/status/1845177885709173012?t=2St0wFE3Uf4_DBsoXnwvyA&s=19

आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची माहिती समोर आली आहे. या आरोपींची नावे कर्नैल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी आहेत. यातील कर्नैल सिंग हा हरियाणाचा, तर धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. गेल्या 9 तासांपासून मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी या आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. हे आरोपी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचत असल्याची धक्कादायक बातमी पोलीस तपासात उघड झाली आहे. त्यासाठी या आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती. तसेच हे आरोपी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून मुंबईत राहत होते आणि ते बाबा सिद्दीकी यांच्यावर लक्ष ठेवून होते, असे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, मुंबई गुन्हे शाखेचे अनेक पथके त्याचा तपास करीत आहेत, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

https://x.com/AHindinews/status/1845196506737111500?t=gVG2hqpOZ1hzc17OaYjUtg&s=19

काल रात्री हत्या झाली होती

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल रात्री साडे नऊच्या सुमारास गोळ्या झाडण्यात आल्या. मुंबईच्या वांद्रे परिसरातील निर्मल नगर भागात ही घटना घडली. त्यानंतर त्यांना अतिशय गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु, डॉक्टरांना यामध्ये यश आले नाही. बाबा सिद्दीकी यांना 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11:27 वाजता लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *