मुख्यमंत्र्यांनी घेतला पंढरपुरातील आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा

पंढरपूर, 15 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी श्री क्षेत्र पंढरपूर येथील सोयी-सुविधांचा घेतला आढावा. यासंदर्भात पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या. यामध्ये एकादशीच्या दिवशी वाहतुकीचे योग्य नियोजन करा. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे सर्वसामान्य भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, यांसारखे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

 https://x.com/CMOMaharashtra/status/1812553464662446543?s=19

15 लाख भाविकांना पाणी व ज्यूसचे मोफत वाटप

आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य सरकारने यावर्षीपासून प्रत्येक दिंडीला जाहीर केलेले 20 हजार रुपयांचे अनुदान खात्यात झाले जमा झाले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तसेच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्याचे मुख्यालय पंढरपूर येथे राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये येणाऱ्या 15 लाख भाविकांना पाणी व ज्यूसच्या बाटल्यांचे मोफत वाटप करणार आहे. त्यासाठी स्टॉल्सची संख्या वाढवावी, या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. सर्व भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध होईल व सर्व ठिकाणी स्वच्छता राहील याबाबत अधिक जागरुक राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिल्या.

https://x.com/mieknathshinde/status/1812529765653319759?s=19

स्वच्छतेचा आणि सोयीसुविधांचा आढावा

तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूरात जाऊन तिथे वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयीसुविधांचा आणि स्वच्छतेचा आढावा घेतला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या दुचाकीवर बसून मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर परिसरातील सोयी-सुविधा आणि स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी त्यांनी चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर असलेल्या 65 एकर परिसराला भेट देऊन तेथे जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला. यामध्ये महिला आणि पुरूषांसाठीची स्वच्छतागृहे, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता तसेच शहरातील स्वच्छतेची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच त्यांनी यावेळी पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील रस्त्याच्या स्वच्छतेबद्दल प्रशासनाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *