मुख्यमंत्र्यांनी दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली

मुंबई, 14 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्थसहाय्याने हृदयशस्त्रक्रिया, कॅन्सर, जन्मतः मूकबधिर, बोन मेरो ट्रान्सप्लांट आदी दुर्धर आजारांवर मात केलेल्या 50 लहान मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केली.

अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार

या सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिकचे डॉ. राज नगरकर, ठाणे येथील भूमकर हॉस्पिटलचे डॉ. आशिष भूमकर, यशश्री हॉस्पिटल सांगलीचे डॉ. सुधीर कदम, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष सिंह, डॉ. श्रीनिवास, डॉ. अजय ठक्कर, डॉ. उप्पल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.

यावेळी या मुलांच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री सहायता कक्षातून मिळालेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री आणि डॉक्टरांचे आभार मानले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “दिवाळी सण हा कौटुंबिक कार्यक्रम असतो. गेल्या वर्षी मी याच ठिकाणी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली होती. आज मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करत आहे. गेली अनेक वर्षे मी सर्वसामान्यांसोबत राहून त्यांच्या अडीअडचणीत मदत करण्याचे काम करीत आहे.

फटाक्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात आणखी वाढ

तेच काम मी आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व महात्मा फुले जनआरोग्य सारख्या विविध योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी करीत आहे. राज्यातील एकपण रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांत आरोग्याच्या सोयी सुविधा पोहचवण्याचे काम हे राज्य सरकार कायमच करीत आहे. आता यंदाची दिवाळी आपण मोठ्या उत्साहात करीत आहोत.” दरम्यान या दिवाळी कार्यक्रमात ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.

One Comment on “मुख्यमंत्र्यांनी दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *