मुंबई, 30 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल डॉ. रमेश बैस यांचा आज राजभवनात निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राज्यपालांना श्रीरामाची मूर्ती भेट म्हणून दिली. त्यानंतर मावळते राज्यपाल रमेश बैस यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. शेवटी राज्याचे मावळते डॉ. रमेश बैस यांना उपस्थित सर्व मान्यवरांनी भावपूर्ण निरोप दिला.
https://x.com/maha_governor/status/1818253176862347753?s=19
याप्रसंगी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, राज्यपालांचे सचिव प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याला मिळाले नवे राज्यपाल!
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच अनेक राज्यांमध्ये राज्यपालांची नवीन नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे महाराष्ट्राला आता नवीन राज्यपाल मिळाले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी निवड केली आहे. सीपी राधाकृष्णन हे यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. त्यानंतर ते आता लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.