कठडा तोडून गाडी पडली नीरा नदीत!

इंदापूर, 6 जानेवारीः इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर-नातेपुते मार्गावरील कळंबोली नजीकच्या नीरा नदी पुलावरून एक स्विफ्ट गाडी 3 जानेवारी 2022 रोजी नीरा नदीत पडली. सदर गाडीत दोन व्यक्ती होते. नदीच्या पुलावरून समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाईटच्या तीव्र प्रकाशामुळे सदर गाडी संरक्षण कठडा तोडून नीरा नदीत बुडाली. या अपघातात दोघेही जण बचावले आहेत. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

विद्यार्थ्यांनी बनविल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू

वालचंदनगर पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सागर घोडके (वय 28, रा. सांगली नं. 1, ता. करमाळा जि. सोलापूर) त्यांचे मेहुणे सुशांत राजेमाने (रा. कळंबोली ता. इंदापूर) हे दोघे या स्विफ्ट गाडीमध्ये होते. आपले काम उरकून ते मंगळवार, 3 जानेवारी रोजी पहाटे 3 च्या सुमारास घोडके हे त्यांच्या मेहुण्यास कळंबोली येथे सोडण्यासाठी इंदापूर, जंक्शन, वालचंदनगर या मार्गे कळंबोली येथे वालचंदनगर नातेपुते रोडने जात होते. प्रवीण ढाब्याच्या नजीक विरुद्ध दिशेने नातेपुते बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाने कट मारल्याने, या वाहनाचे लाईटचा उजेडामुळे चालकाला समोरील कळंबोली पुलाचा अंदाज न आल्याने, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे स्विफ्ट गाडी (एमएच 45 एक्यू 9293) पुलावरून खाली नदीच्या पाण्यात कोसळली.

बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिले देहदान

या पुलावर काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या लोखंडी संरक्षण कठड्याला धडकून नीरा नदीच्या पाण्यात ही गाडी पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. खबर देणार व मेहुणा असे गाडीतून बाहेर पाण्यातून पोहत नदी किनारी आले. यामध्ये पाण्यामध्ये पडून गाडीचे नुकसान झाले असून, ही गाडी दुपारी क्रेनच्या साहाय्याने नदीतून बाहेर काढण्यात आली.

2 Comments on “कठडा तोडून गाडी पडली नीरा नदीत!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *