द्रुतगती मार्गावर बस उलटली; सुमारे दोन डझन लोक जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

जयपूर, 29 मे: (विश्वजीत खाटमोडे) राजस्थानमध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला. हरिद्वारहून जयपूरला येणारी बस दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर राजस्थानच्या दौसा गावाजवळ उलटली. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजस्थानच्या दौसा येथील बांदीकुई येथील सोमाडा गावाजवळ आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 24 जणांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर यामधील दोघांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

https://twitter.com/ANI/status/1795647132910989434?s=19

प्रवासी जयपूरला येत होते

यावेळी सर्व प्रवासी या एसी स्लीपर कोच बसमधून हरिद्वारहून जयपूरला येत होते. त्यावेळी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर येताच या बसची पलटी झाली. अपघातानंतर येथे लगेचच स्थानिक लोक जमा झाले. यावेळी त्यांनी या बसमधील प्रवाशांना तातडीने बाहेर काढून त्यांना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बस चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या अपघाताचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

https://twitter.com/ANI/status/1795647136383868960?s=19

रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती

यासंदर्भात दौसा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र मीना यांनी अधिक माहिती दिली आहे. हरिद्वारहून जयपूरला येणारी बस दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर पलटी झाल्याने सुमारे दोन डझन लोक जखमी झाले आणि इतर 2 गंभीर जखमी झाले. एक्स्प्रेस वेच्या पॉइंट क्रमांक 165 जवळ ही घटना घडली. गंभीर जखमींना जयपूर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. बसचा चालक झोपी गेला होता, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *