इंदापूर, 23 मे: (विश्वजीत खाटमोडे) उजनी धरणाच्या जलाशयात एक प्रवासी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व 6 जणांचे मृतदेह आज सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांना सापडले आहेत. मृतांमध्ये 3 पुरूष, 1 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. तर यामध्ये एका जणाचा जीव वाचला होता. या दुर्घटनेतील बुडालेली बोट काल सापडली होती. इंदापूर तालुक्यातील कळाशी गावाजवळ उजनी धरणाच्या पाण्यात बोट उलटल्यामुळे सहा जण बेपत्ता झाले होते.
#उजनी धरणाच्या जलाशयात एक प्रवासी #नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व सहा जणांचे मृतदेह आज सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांना सापडले. यामध्ये तीन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश. या दुर्घटनेतील नाव काल सापडली . pic.twitter.com/I4Pz6hBUAX
— AIR News Pune (@airnews_pune) May 23, 2024
दोन दिवसांपूर्वी घडली दुर्घटना
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी झाले. तेव्हापासून तिथे बचावकार्य सुरू होते. मात्र दुर्दैवाने आज बेपत्ता झालेल्या 6 जणांचे मृतदेह एनडीआरएफच्या पथकाला सापडले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले एनडीआरएफचे बचावकार्य आज समाप्त झाले आहे. ही दुर्घटना 21 मे रोजी सायंकाळी घडली होती. त्यावेळी 7 जण एका बोटीतून कुगाव येथून कळाशी गावाकडे जात होते. यादरम्यान वादळी वारे आणि पावसामुळे त्यांची बोट उजनी धरण पत्रात उलटली. त्यामुळे या दुर्घटनेत बोटीतून प्रवास करीत असलेले हे 6 जण बेपत्ता झाले. यामध्ये 3 पुरूष, 1 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश होता.
एकजण सुखरूप
त्याचवेळी त्यातील एका व्यक्तीने नदी पात्रात पोहत येऊन आपला जीव वाचवला. राहुल डोंगरे असे या दुर्घटनेतून वाचलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुल डोंगरे हे पोलिस उपनिरीक्षक आहेत. ते या दुर्घटनेतून सुखरूप पाण्याच्या बाहेर आले. दुसरीकडे मात्र बेपत्ता झालेल्या 6 जणांचा शोध घेतला जात होता. एनडीआरएफच्या पथकाला काल सकाळी 35 फूट खोल पाण्यात ही बोट सापडली होती. त्यानंतर आज या दुर्घटनेतील सर्व बेपत्ता झालेल्या 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरातील अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.