पीडब्ल्यूडीच्या पालखी मार्गाच्या रस्त्यामध्ये वृक्षतोडीची अंधा-धुंदी

बारामती, 18 जूनः कोरोना काळ संपल्यामुळे यंदा पालखी मार्ग सुरू होणार आहे. यामुळे यावर्षी वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बारामती (पीडब्ल्यूडी) हद्दीत जाणारा पालखी सोळावा हा आनंददायी व अल्लाद आहे.

परंतु पालखी मार्गात येणाऱ्या वृक्षतोड करण्याचे काम पीडब्ल्यूडीने हाती घेतले असून अनेक मिस्तरी व मैल कोल्हे गैर प्रकार करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या वृक्षांच्या फांद्या वाहतुकीचा अडथळा करीत आहे, जे रुक्ष वाढलेले आहेत अशी वृक्ष छाटण्याचे व तोडण्याचे स्थानिक मिस्त्री ना परवानगी दिल्याचे समजते. याचा गैरफायदा घेऊन स्थानिक मिस्तरी व मैल कोल्हे यांनी चांगलाच धंदा उघडला आहे. दहा हजार रुपयांच्या किंमतीची लाकडांना बाराशे रुपयांची पावती दिली जाते. पंचनामे न झालेले वृक्ष तोडली छाटली जात आहे. याबाबत पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठांना विचारले असता अल्प झाडे तोडण्याचे व छाटण्याची परवानगी उपअभियंता बारामती यांनी दिलेली सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *