मुंबई, 21 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल (दि.20) मतदान पार पडले. आहे. या मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.11 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 76.25 टक्के इतके मतदान झाले आहे. तर मुंबई शहरात सर्वात कमी म्हणजे 52.07 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
https://x.com/MahaDGIPR/status/1859317155231088680?t=sPs7Vt61vT1b83X5JFyuHw&s=19
जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी
या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात सरासरी 61.05 टक्के इतके मतदान झाले आहे. तर रायगड जिल्ह्यात 67.23 टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात 64.55 टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 68.40 टक्के, सातारा जिल्ह्यात 71.71 टक्के, सांगली जिल्ह्यात 71.89 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 76.25 टक्के, सोलापूर जिल्ह्यात 67.36 टक्के, अकोला जिल्ह्यात 64.98 टक्के, अमरावती जिल्ह्यात 65.57 टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 68.89 टक्के, बीड जिल्ह्यात 67.79 टक्के, भंडारा जिल्ह्यात 69.42 टक्के, बुलढाणा जिल्ह्यात 70.32 टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात 71.27 टक्के, धुळे जिल्ह्यात 64.70 टक्के, गडचिरोली जिल्ह्यात 73.68 टक्के, गोंदिया जिल्ह्यात 69.53 टक्के, हिंगोली जिल्ह्यात 71.10 टक्के, जळगाव जिल्ह्यात 64.42 टक्के, जालना जिल्ह्यात 72.30 टक्के मतदान झाले आहे.
मुंबई शहरात सर्वात कमी मतदान
अहिल्यानगर जिल्ह्यात 71.73 टक्के, लातूर जिल्ह्यात 66.92 टक्के, मुंबई शहर 52.07 टक्के, मुंबई उपनगर 55.77 टक्के, नागपूर जिल्ह्यात 60.49 टक्के, नांदेड जिल्ह्यात 64.92 टक्के, नंदुरबार जिल्ह्यात 69.15 टक्के, नाशिक जिल्ह्यात 67.57 टक्के, धाराशिव जिल्ह्यात 64.27 टक्के, पालघर जिल्ह्यात 65.95 टक्के, परभणी जिल्ह्यात 70.38 टक्के, ठाणे जिल्ह्यात 56.05 टक्के, वर्धा जिल्ह्यात 68.30 टक्के, वाशिम जिल्ह्यात 66.01 टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यात 69.02 टक्के इतके मतदान झाले आहे.