रत्नागिरी, 05 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे बालपणीचे घर आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या तीन मालमत्तांचा आज लिलाव होणार आहे. यासंदर्भात सरकारने नोटीसही जारी केली आहे. याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. याठिकाणी इब्राहिमच्या कुटुंबाच्या मालकीच्या चार मालमत्ता आहेत. ही मालमत्ता शेतजमिनीच्या स्वरुपात आहे. या चारही मालमत्तांची राखीव किंमत 19 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1743179858576888167?s=19
तपास यंत्रणांनी दाऊद इब्राहिमची ही मालमत्ता स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स या कायद्यांतर्गत जप्त केली होती. दाऊद इब्राहिमच्या या चारही मालमत्ता वडिलोपार्जित असून, त्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके या गावात आहेत. त्याचा आता लिलाव होणार आहे. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी किती लोक येणार आहेत? हे सध्या तरी समजू शकलेले नाही. तर कोणताही सामान्य माणूस या लिलावात बोली लावून ही मालमत्ता खरेदी करू शकतो.
हा लिलाव 5 जानेवारी रोजी मुंबईतील सेफेमा कार्यालयात दुपारी 2 ते 3:30 या वेळेत होणार आहे. तर याच्या आधी देखील या संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता. मात्र, दाऊद इब्राहिमची ही मालमत्ता असल्याने त्यावेळी ही जामीन खरेदी करण्यासाठी कोणीही खरेदीदार पुढे आला नव्हता. आता सेफेमा त्याच्या मालमत्तेचा पुन्हा एकदा लिलाव करणार आहे. दाऊद इब्राहिमची भीती लोकांच्या मनातून पुसून टाकण्यासाठी त्याच्या संपत्तीचा लिलाव सरकारकडून केला जात आहे.