बारामतीत कापसाची आवक वाढली!

बारामती, 6 नोव्हेंबरः बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड मध्ये दर बुधवार आणि शनिवार या दिवशी कापसाचे लिलाव सुरू झाले आहेत. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड आवारात शनिवारी, 5 नोव्हेंबर 2022 रोजी कापसाची 100 क्विंटलची आवक झाली.

मार्केट यार्डच्या आवारात आलेल्या सदर कापसाला प्रति क्विंटल 7901 रुपये असा दर मिळावा. तर सरासरी 7800 रुपयांचा दर मिळाला. स्वच्छ व निवडून आणलेल्या चांगल्या कापसाला जादा दर मिळत असून आवकमध्येही वाढ होताना दिसत आहे. यापुढे आवकमध्ये वाढ झाल्यास बाहेरील पेठेतील खरेदीदार येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप आणि प्रशासक मिलिंद टांगसाळे यांनी सांगितले.

जेजुरी- बारामती मार्ग बनला अपघातांचा सापळा

हमखास उत्पन्न देणारे कापूस हे नगदी पिक असल्याने बारामतीसह फलटण तसेच आसपासचे तालुक्यात कापसाचे लागवडीत वाढ होत आहे. कापसाची मागणी, पुरवठा आणि दराची सध्याची परिस्थिती लक्षात घेता भविष्यात शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. यासाठी बाजार आवारात शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी याबाबत विविध सुविधा पुरविणेचा समितीचा मानस आहे. यापुढे बारामती बाजार समितीमध्ये कापूस मार्केट विकसित होण्यासाठी आडते, व्यापारी व बाजार समिती प्रयत्नशील राहणार आहे.

बारामती आगारातील 9 जणांवर मोठी कारवाई

कापसाची उघड लिलावात विक्री तसेच अचूक वजनमाप आणि त्याच दिवशी पेमेंट असा बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे नावलौकिक आहे. त्यामुळे परस्पर व्यापाऱ्यांना कापूस विक्री करण्याऐवजी शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात येत आहे.

One Comment on “बारामतीत कापसाची आवक वाढली!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *