पुणे, 18 नोव्हेंबरः कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांनतर राज्य मंडळाकडून पुढील वर्षीची इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणार आहे. दहावी-बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बारावीसाठी साडेतेरा लाख, तर दहावीसाठी पावणेबारा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्यात मुंबई आणि पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. अर्ज भरणार्या विद्यार्थ्यांचा टक्का यंदा वाढणार असल्याचे दिसत आहे.
बारामती प्रीमियर लीगच्या थरारक पर्व 4 ला उद्यापासून सुरुवात!
दहावी-बारावीचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाने अगोदरच जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 दरम्यान घेण्यात येणार आहे. तर, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान घेण्यात येणार आहे. हे जरी संभाव्य वेळापत्रक असले, तरी यात फारसा बदल होणार नसल्याचे दिसत आहे. बारावीसाठी आता नियमित शुल्क देऊन 25 नोव्हेंबर, तर विलंब शुल्क देऊन 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?
उच्च माध्यमिक शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना शुल्क बँकेत भरण्यासाठी 2 डिसेंबर 2022 ची मुदत देण्यात आली आहे. तर, विद्यार्थ्यांच्या याद्या तसेच प्रिलिस्ट जमा करण्यासाठी 7 डिसेंबरची मुदत दिली आहे. दहावीचे अर्ज भरण्यासाठी नियमित शुल्क देऊन 25 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.
बारावीसाठी तीन महिन्यांचा, तर दहावीसाठी साडेतीन महिन्यांचा कालावधी राहिल्याने परीक्षेच्या तयारीला वेग येणार आहे. दहावी-बारावीचे अर्ज भरण्यास परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरपर्यंत संधी देण्यात येणार असल्यामुळे अर्ज करणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.
One Comment on “10वी-12वी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू”