राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

बारामती, 11 फेब्रुवारीः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील खंडूखैरेवाडी येथील राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुल येथे नुकताच वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कूलच्या इंग्रजी माध्यम व मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था वार्षिक स्नेहसंमेलन 2022 कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्याक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, महाराष्ट्रीयन संस्कृती व धार्मिक गाण्यांवर डान्स कला सादर केली.

आरटीओ कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांकडून आवाहन

सदर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ‘चंद्रा’ गाणे व फ्युजन सॉंग हे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याने सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शशांक मोहीते, प्रमोद खेत्रे, संस्थापक अध्यक्ष दिलिप खैरे, पोपट खैरे, विशाल खैरे, निलेश खैरे, व विद्यालयाच्या प्राध्यापिका मनिषा खैरे व मयुरेशवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे मुख्याध्यापक वाबळे सर हे होते.

प्रबुद्ध युवा संघटनेच्या आंदोलनाला विविध पक्षांचा जाहीर पाठिंबा

विद्यार्थ्यांना डान्स शिकवण्यासाठी अजित अडसुळ सरांचे मार्गदर्शन लाभले. सुत्रसंचालन स्नेहल खैरे व तावरे सरांनी केले. तसेच यावेळी मैदानी स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाची तयारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केली.

One Comment on “राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *