अल्पवयीन मुलाचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपीला अटक! 8 महिन्यांनी गुन्ह्यांचा उलघडा

मुंबई, 30 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई पोलिसांना एका अल्पवयीन मुलाचे अपहरण आणि हत्या प्रकरणात 8 महिन्यानंतर मोठे यश मिळाले आहे. मुंबईतील वडाळा परिसरात 12 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हे प्रकरण जानेवारी 2024 मध्ये घडले होते. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. विपुल बिरेन शिकारी असे अटक केलेल्या 39 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. त्याला मुंबई पोलिसांनी दिल्लीतील जीबी रोड परिसरातून अटक केली आहे. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.

https://x.com/ANI/status/1829225378793333077?s=19

अपहरणानंतर मुलाची हत्या

यावर्षी जानेवारी महिन्यात आरोपीने या 12 वर्षीय मुलाचे अपहरण केले होते. हा मुलगा गायब झाल्यानंतर यासंदर्भात 28 जानेवारी 2024 रोजी या अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून वडाळा पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर वडाळा पोलिसांनी या मुलाला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. सुमारे दोन महिन्यांनंतर 5 मार्च 2024 रोजी पोलिसांना वडाळ्यातील खारगंगा मैदान खाडीमध्ये या मुलाचा मृतदेह सापडला होता. तेंव्हापासून हा आरोपी फरार झाला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते.

आरोपीला सापळा रचून अटक

या घटनेनंतर अखेर 21 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांना या प्रकरणातील विपुल शिकारी हा आरोपी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांना या आरोपीची माहिती दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला अटक केली. तसेच त्यांनी यावेळी आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या यप्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करीत आहेत. हा आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *