ठरलं! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

मुंबई, 30 जूनः भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांची विधान भवनाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असे जाहीर केले. त्यामुळे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता एकनाथ शिंदे हे एकटेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

सध्याची राज्याची राजकीय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला भाजपचा बाहेरून पाठिंबा राहणार आहे. शपथ विधीनंतर काही दिवसात मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

बिग ब्रेकिंगः अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *