सुप्रिया सुळेंचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल!

पुणे, 21 ऑक्टोबरः पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे- सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनाही बसला. मात्र, यावेळी त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे. सुप्रिया सुळेंचा हा हटके आणि नायक स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधलं.

लाकडी निंबोडी योजनेचा फेर सर्व्हे होणार

खासदार सुप्रिया सुळे या सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. नागरिकांना होणाऱ्या अडचणी समजावून घेत त्या सरकार दरबारी मार्गी लावण्यासाठी त्यांनी या सोशल मीडियाचा पुरेपुर वापर केल्याचं अनेक वेळा दिसून येतं. मग रत्यांवरती पडलेले खड्डे असो वा एखादं आवडलेलं ठिकाण किंवा हॉटेल असो या बाबतच्या सर्व अपडेटस सुप्रिया सुळे आपल्या सोशल मीडियावर सतत देतात. अशातच आता त्यांचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हडपसर ते सासवड असा 20 ऑक्टोबर 2022 रोजी प्रवास करत असताना एक गाडी अचानक बंद पडल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावेळी त्यांनी तात्काळ ती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांना आवाहन करत स्वतः देखील त्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी वाहतूक पोलिसांशी साधलेला संवाद आणि वाहतूकचालकांना केलेल्या सूचना देताना दिसताहेत.

भीमा पाटस सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर सुरु

शिवाय हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी ‘टॉप प्रायोरिटी’वर लक्ष देण्याची गरज असून या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली आहे. सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते. आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होतं आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे. मात्र या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी सुप्रिया सुळेंना ट्रोल करताना दिसत आहेत.

One Comment on “सुप्रिया सुळेंचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *