बारामती, 12 ऑक्टोबरः(प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी गावात 11 ऑक्टोबर 2022 रोजी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने आठवडी बाजारासाठी बसलेल्या छोट्या मोठ्या भाजीपाला व्यापाऱ्यांचे मोठे हाल झाले. या पावसाच्या पाण्याने त्यांचा माल वाहून गेल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
गैरवर्तणूक करणाऱ्या दुकानदारावर कारवाईची मागणी
अचानक झालेल्या पावसामुळे मुर्टी बाजार तळावरील छोटे मोठे व्यापारी व शेतकरी यांनी विकायला आणलेल्या बाजाराचे नुकसान झाले आहे. बाजार तळावर जागोजागी पाणी साचले. काही ठिकाणी पाण्याचा पाट ही वाहिलेले दिसतात.
फळपिक विम्यासाठी बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन
बाजार तळावर कट्टे नसल्याने येथील शेतकरी व्यापाऱ्यांचा माल पाण्यात वाहून गेला. यामुळे व्यापारी हताश होऊन वाहत जाणाऱ्या मालाकडे बनवलेल्या कृत्रिम राहोट्यांकडे पहात पडणाऱ्या पावसाबरोबर डोळ्यातील अश्रू देखील गाळत होते. काही वर्षांपूर्वी येथील विद्यालयासमोर गाळे बांधले आहेत, मात्र या ठिकाणी बाजार भरत नाही. या कट्यावर बाजार भरावा, अशी मागणी भाजप नेते बाळासो बालगुडे यांनी केली आहे.
तहसिलदार पाटील यांचे शिधापत्रिका धारकांना आवाहन