बारामती, 28 मेः बारामती नगर परिषदमध्ये होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये एकूण 20 टक्के लोकसंख्या असणारे अनुसूचित जातीच्या लोकांची भावना दुखावणारे चित्र आमराई भागात दिसत आहे. अनुसूचित जातीच्या वस्त्यांची लोकसंख्याची विभाजन केलेले आहेत. त्यामुळे मार्गदर्शन सुचनांची पायमल्ली झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रभाग 12, 13,14,18, 19 आणि 20 असे प्रभाग अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर निवडून येणाऱ्यांच्या प्रतिनिधींवर अन्याय होणार आहे.
ज्या ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या जास्त आहे, अशा प्रभागांमध्ये सर्वसाधरण लोकसंख्या प्रमाण गुसडलेले आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या प्रतिनिधीला निवडणू येताना सर्वसाधारण लोकसंख्येवर अवलंबून रहायला लागणार आहे.
परिणामी गुलाम अनुसूचित जातीचा प्रतिनिधी निवडून येणार आहे, असे मत भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र सचिव यशपाल भोसले यांनी व्यक्त केले आहे.