

हा अपघात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडला. डंपर खाली दुचाकी सापडल्याने या तिघांचा मृत्यू झाला. एम एच 16 सी ए 0212 या डंपर खाली ही गाडी चिरडली. ओंकार राजेंद्र आचार्य या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. ते मूळचे इंदापूर तालुक्यातील संसर येथील रहिवासी असून सध्या बारामती येथील मोरगाव रोड येथे वास्तव्यास होते.

या घटनेत 4 वर्षीय मधुरा ओंकार आचार्य व 10 वर्षीय सही ओंकार आचार्य या दोन्ही मुलींचा देखील मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण बारामतीत हळहळ व्यक्त केले जात आहे.

