बारामतीतील महिलांना तहसिलदारांचे आवाहन

बारामती, 14 नोव्हेंबरः मतदान प्रक्रियेत महिला आणि पुरुषांना समान संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. बारामती तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले.

काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमाअंतर्गत तहसिल कार्यालयात 13 नोव्हेंबर 2022 रोजी महिला मतदार नोंदणी शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवडणूक नायब तहसिलदार पी. डी. शिंदे, शासकीय कार्यालयातील महिला, तलाठी आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाचा मतदान प्रक्रियेत महिलांचा मोठा सहभाग रहावा, यावर भर राहिला आहे. महिला व पुरुष असा भेद न करता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. महिला मतदारांनी मतदान नोंदणी करुन मतदान करणे महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीत आपले नाव आहे का, याची खात्री करावी. ज्या महिलांचे वय वर्ष 18 पूर्ण झाले आहे, त्यांनी वयाचा पुरावा सादर करून मतदार नोंदणी करून घ्यावी.

कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने जिंकली आंतर तालुका क्रिकेट स्पर्धा!

महिलांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, शासकीय संस्था यांनी घरकाम करणाऱ्या महिला व वंचित घटकातील महिला याना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. लग्न झालेल्या महिलांचे पूर्वीच्या ठिकाणचे नाव कमी करून नवीन ठिकाणी नोंदविणे आवश्यक आहे. अगर एखाद्या मतदार यादीत महिलांची संख्या कमी असेल, त्या ठिकाणी महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

One Comment on “बारामतीतील महिलांना तहसिलदारांचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *