मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड! कोणत्या सेवांवर परिणाम झाला?

दिल्ली, 19 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. याचा परिणाम जगभरातील उड्डाणे, विमानतळ, बँकिंग सेवा, आयटी कंपन्या आणि शेअर बाजार यांच्यासह सर्व क्षेत्रांवर झाल्याचा पाहायला मिळाला. जगभरातील बहुतेक लॅपटॉप संगणक मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. त्यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांमधील यंत्रणा ठप्प झाली आहे. त्याचा कंपन्यांच्या कामकाजावर वाईट परिणाम झाला आहे. काम बंद पडल्याने अनेक मोठ्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा बिघाड लवकर निघाला नाही तर, मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. हा आजवरचा सर्वात मोठा आयटी आऊटेज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत अरबो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

https://x.com/AshwiniVaishnaw/status/1814237889649422479?s=19

https://x.com/ANI/status/1814248209465672072?s=19

विमान सवेला फटका

भारतातील विमान सेवाला देखील याचा फटका बसला आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम विमान कंपन्यांच्या ऑनलाइन सेवेवर झाल्याचे दिसून आले. यामध्ये प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढताना अडचणी आहेत. त्यामुळे मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरूसह देशभरातील विमानतळांवर मोठी गर्दी दिसून आली. तसेच यामुळे विमान कंपन्यांची काही उड्डाणे रद्द झाली. तर काही विमानतळांवर विमानांच्या उड्डाणाला उशीर लागला होता. याचा त्रास प्रवाशांना झाला आहे.

शेअर मार्केटवर परिणाम

या बिघाडामुळे स्टॉक एक्स्चेंज, रेल्वे, बँकिंग, एअरलाईन्स टीव्ही चॅनेल, ऑनलाईन स्टोअर्स, रुग्णालये आणि आयटी या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यासोबतच मायक्रोसॉफ्ट मधील मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे भारतीय शेअर बाजारातील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये एंजल वन, 5पैसा, आयआयएफएल सिक्युरिटीज, नुवामा, मोतीलाल ओसवाल या भारतीय शेअर बाजाराच्या व्यापाराशी संबंधित असलेल्या कंपन्यांच्या कामावर आज परिणाम झाला होता. याची माहिती वरील कंपन्यांनी दिली आहे.

https://x.com/George_Kurtz/status/1814235001745027317?s=19

जगभरातील कामकाजावर परिणाम

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडांमुळे भारतासह अमेरिका, ब्रिटन, स्पेन, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांतील कामकाजावर परिणाम झाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या एवढ्या मोठ्या बिघाडाच्या मागे क्राउडस्ट्राईकचे नवीन अपडेट असल्याचे बोलले जात आहे. ज्याचा विंडोज-आधारित डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर परिणाम झाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या एका निवेदनात म्हटले आहे की, ते या समस्येची चौकशी करत आहेत. त्यामुळे विविध Microsoft 365 ॲप्स आणि सेवा प्रभावित होत आहेत. आमच्या सेवा अजूनही सतत सुधारत आहेत. दरम्यान, या तांत्रिक बिघाडाच्या संदर्भात क्राउडस्ट्राईकचे सीईओ जॉर्ज कुर्ट्झ यांनी माहिती दिली आहे. हा सायबर हल्ला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही समस्या ओळखली असून ती सोडवली गेली आहे. आमची टीम ग्राहकांची सुरक्षा आणि स्थिरता सुनिश्चित करण्यात पूर्णपणे गुंतलेली आहे. लवकरच ही समस्या सोडविण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

https://x.com/RBI/status/1814271713049530687?s=19

देशातील बँकिंग सेवेवर काहीसा परिणाम

त्याचवेळी मायक्रोसॉफ्टच्या या तांत्रिक बिघाडाचा भारतातील बँकिंग सेवेवर फारसा परिणाम झाला नसल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मायक्रोसॉफ्ट सर्व्हर आउटेजमुळे भारतीय वित्तीय क्षेत्रावर फारसा परिणाम झाला नाही. आरबीआयने सांगितले की या आउटेजमुळे फक्त 10 बँका आणि एनबीएफसी मध्ये किरकोळ व्यत्यय आला. मात्र, नंतर ती सोडवण्यात आली, असे आरबीआय ने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *