टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दमदार विजय

धर्मशाळा,  22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आज (दि.22) टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्ध सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर 4 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. याचबरोबर आयसीसीच्या स्पर्धेत टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तब्बल 20 वर्षानंतर जिंकली आहे. आजच्या सामन्यात न्युझीलंडने टीम इंडियासमोर 50 षटकांत 274 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष टीम इंडियाने 48 षटकांत पूर्ण केले.

भारताने न्यूझीलंडला 273 धावांत रोखले

या विजयामुळे टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेच्या गुणतालिकेत 10 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचली आहे. या सामन्यात फलंदाजीत भारतातर्फे विराट कोहलीने सर्वाधिक 95 धावांची जबरदस्त खेळी केली. मात्र, संघाला विजयासाठी 5 धावा हव्या असताना विराट बाद झाला. त्यामुळे विराट कोहलीचे वनडेतील 49 वे शतक हुकले. त्यानंतर रविंद्र जडेजाने चौकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. दरम्यान, टीम इंडियाच्या डावाची सुरुवात आधीच्या सामन्यांसारखी चांगली झाली. यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. या सामन्यात रोहित शर्माने 46, श्रेयस अय्यर 33, केएल राहुल 27 आणि रविंद्र जडेजाने नाबाद 39 धावा केल्या. तर या वर्ल्डकपमध्ये आपला पहिला सामना खेळत असलेला सूर्यकुमार यादव या सामन्यात धावबाद झाला.

फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे – सुप्रिया सुळे

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 50 षटकांत सर्वबाद 273 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड संघाकडून डॅरिल मिशेलने 130 आणि रचिन रवींद्र याने 75 धावांची शानदार खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला टीम इंडियासमोर 273 धावांचे लक्ष्य ठेवता आले. तर या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. यावेळी भारताच्या मोहम्मद शमीने न्यूझीलंडचे 5 गडी बाद केले. त्यामुळे मोहम्मद शमीला या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या विजयामुळे भारतीय संघ जवळपास उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता टीम इंडियाचा पुढील सामना इंग्लंविरुद्ध होणार आहे.

One Comment on “टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दमदार विजय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *