अहमदाबाद, 18 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलिया आता भारतीय संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. दरम्यान या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे काही सामने गमावले. मात्र त्यानंतर त्यांनी आपला खेळ उंचवत विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील 9 पैकी 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर त्यांना 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला.
छगन भुजबळ यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 रन्सने पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आता आठव्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007, 2015 या 5 वर्षी विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. मात्र त्यांना 1975 आणि 1996 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकता आली नव्हती.
मराठा आरक्षणासाठी खंडोबा देवाला जरांगे पाटलांनी घातले साकडे
तर दुसरीकडे, भारतीय संघ या विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताने या स्पर्धेतील त्यांचे साखळी फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या लाखो चाहत्यांच्या आशा वाढल्या आहेत. भारतीय संघाने यापूर्वी 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. तर 2003 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. या पराभवाच्या दुःखद आठवणी आजही भारतीय चाहत्यांच्या मनात आहेत. त्यामुळे भारतीय संघाने 2003 च्या विश्वचषकातील पराभवाची परतफेड करत अंतिम सामन्यात विजय मिळवावा, अशी अपेक्षा करोडो भारतीय क्रिकेट चाहते करीत आहेत.
One Comment on “टीम इंडियाने 2003 च्या पराभवाची परतफेड करावी; चाहत्यांची अपेक्षा”